ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

CFTI (Centre For Transforming India) आणि शेरोन बायोमेडिसिन ह्या कँपनीच्या संयुक्त विद्यमाने सायकल वाटप

March 13, 202212:17 PM 49 0 0

उरण दि 12(संगीता ढेरे ) : चित्रलेखाताई पाटील-अलिबाग नगरसेविका शेकाप महिला आघाडी नेत्या.आणि शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा अनंत घरत यांच्या प्रयत्नामुळे उरणमधील ५ वी ते ९ वी च्या मुलींकरीता मोफत सायकल वाटप करण्यात आले.

S.S Patil international school मधे हा कार्यक्रम करण्यात आला.उपस्थित विद्यार्थीनी पालक वर्ग,शिक्षक वर्ग, आणि कंपनीचे पदाधिकारी,शेकाप सरचिटणीस यशवंत ठाकूर, अनंत घरत,महालन अध्यक्षा,रेखा घरत, कविता म्हात्रे,फुंडे ग्रामपंचायत सदस्य,शेकाप महिला सचीव नुतन पाटील, प्रमुख पाहुणे माॅडल दिपिका पाटील,शहर अध्यक्षा नयना पाटील,वुमन क्लब अध्यक्षा नयना ठाकूर,अमित देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.उरण मधे पहिल्यांदाच खास गरीब गरजू मुलीं करीता एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकल वाटप करण्यात आला आहे. ‌शेकापच्या उरण तालुका महिला आघाडी अध्यक्षा सीमा अनंत घरत यांनी केलेल्या या कार्याचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *