जालना ( प्रतिनिधी) : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोर सेनेच्या वतीने २० जानेवारी पासून ते २५ जनेवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.
आज उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता. आळीपाळीने सर्व तालुके या साखळी उपोषणात सहभागी झाले असल्याचे
जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.
केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील साठ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ऐंशी शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी गोर सेनेच्या वतीने संपूर्ण देशभरात दि. २० ते २५ जानेवारी या कालावधीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे. बुधवारी ( ता. २०) व गुरूवारी ता.२१ घनसावंगी तालुक्यातील व शुक्रवार रोजी मंठा तालुक्यातील, व शनिवार परतूर तालुक्यातील, रविवार जालना तालुक्यांतील, व आज सोमवार रोजी आंबल तालुक्यातील कार्यकर्ते व जिल्हा कार्यकारिणी या उपोषणात सहभागी झाले होते…
यावेळी बोलतांना जिल्हा संघटक सुधाकर जाधव यांनी सांगीतले की सरकारने तीनही शेतकरी विरोधी कायदे विनाअट तात्काळ रद्द करावे, सर्व पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा, बियाणे व खतांवरील अनुदान वाढविण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कामगार विरोधी परित केलेले तीनही अधिनियम तात्काळ रद्द करावे. उपोषणकर्त्यांच्या या मागण्या असून मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात गोर सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष सुभाष राठोड, जिल्हा संपर्क प्रमुख ॲड. रवि राठोड, जिल्हा संघटक सुधाकर जाधव व तालुका अध्यक्ष श्याम आडे व संदिप जाधव, तालुका सचिव घनश्याम आडे, बाबू काका, आबासाहेब राठोड, सरदार जाधव, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर राठोड, तालुका सचिव अमोल चव्हाण, कैलाश आडे,अरुण चव्हाण, अविनाश चव्हान आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते….
Leave a Reply