ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अंधार मुक्त तांड्यासाठी मुक्ती संग्राम दिनापासून साखळी उपोषण : गोर सेना तालुकाध्यक्ष संदीप जाधव

September 15, 202114:00 PM 17 0 0

जालना/ मंठा ( प्रतिनिधी) : दीड वर्षापासून वाघोडा तांडा अंधारात असून महावितरणकडे तक्रारी केल्यानंतरही तांड्यात वीज उपलब्ध होत नसल्याने येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा गोर सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी दिला आहे.

या संदर्भात मंगळवारी ( ता. 14) संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली गोर सेनेच्या पदाधिकारी व सैनिकांनी तहसीलदार आणि महावितरण चे शाखा अभियंता यांच्या भेटी घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे, कोरोना संसर्गजन्य परिस्थिती च्या सुरुवाती पासून वाघोडा तांडा हे गाव अंधारात आहे. वीज नसल्याने वृध्द, गरोदर माता, विविध आजारांचे रूग्ण, यांचे हाल होत असून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित आहेत. सध्या, डेंगी, मलेरिया अशा साथरोगांचा फैलाव होत असून अंधारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. असे नमूद करत वाघोडा तांडा येथे तात्काळ वीजपुरवठा सुरळीत न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण केले जाईल. असा इशारा गोर सेना तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी दिला आहे. निवेदनावर संदीप जाधव, जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, अर्जुन राठोड, शंकर राठोड, रवी पवार, उमेश राठोड, प्रफुल्ल राठोड, प्रदीप पवार, विकास राठोड, सचिन पवार, पवन पवार, पवन राठोड,राहुल राठोड, अमोल राठोड, प्रविण पवार, पिंटू पवार, राजेश राठोड, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *