ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गौर सेनेचे जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण। दुसरा दिवस : सर्व तालुक्यांचा सहभाग

January 22, 202113:46 PM 52 0 0

जालना ( प्रतिनिधी) : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गौर सेनेच्या वतीने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता. आळीपाळीने सर्व तालुके या साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.

केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या
शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील पन्नास दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ऐंशी शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी गौर सेनेच्या वतीने संपूर्ण देशभरात दि. वीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. बुधवारी ( ता. २०) व गुरूवारी ता.२१ घनसावंगी तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी या साखळी उपोषणात सहभागी झाले. केंद्र सरकारने तीनही शेतकरी विरोधी कायदे विनाअट तात्काळ रद्द करावे, सर्व पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा, बियाणे व खतांवरील अनुदान वाढविण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कामगार विरोधी परित केलेले तीनही अधिनियम तात्काळ रद्द करावे. उपोषणकर्त्यांच्या या मागण्या असून मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उपोषणात जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अर्जुन चव्हाण, जिल्हा संघटक सुधाकर जाधव, सहसंघटक प्रकाश राठोड, अमोल चव्हाण, निरंजन चव्हाण , शहराध्यक्ष शरद राठोड हे सहभागी झाले आहेत. मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पाटील चंद यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. उद्या दि. २२ रोजी मंठा, दि. २३ ला परतूर, २४ रोजी जालना, तर दि. २५ रोजी अंबड तालुक्यातील गौर सेनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *