जालना (प्रतिनिधी) ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ यांना धमकीवजा इशारा देणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सत्तेतुन बाहेर झाल्याने त्यांचे डोके ठिकाणावर राहीले नसुन लायकी नसतांना आदरणिय छगनराव भुजबळ यांना धमकी देवु पाहणार्या चंद्रकांत पाटील यांना वेळीच आवर घालावा नसता महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते आपल्या पध्दतीने त्यांना प्रत्युत्तर देतील असा ईशारा समता परिषदेचे जालना शहर अध्यक्ष दिपक वैद्य यांनी दिला आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिपक वैद्य यांनी म्हटले आहे की, देशातील पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहिर होत असतांना ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनजी यांच्या बाजुने प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना नाहक टार्गेट करत तुम्ही जामीनावर सुटला आहेत. असा प्रकारची धमकीवजा इशारा दिला.या धमकीचा समता परिषदेच्या वतिने निषेध करण्यात आला असुन चंद्रकांत पाटील यांची भुजबळ यांच्यावर आगपाखड करण्याची लायकी नसल्याचे दिपक वैद्य यांनी या पञकात म्हटले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा माथेफिरुंना त्वरीत आवर घालावा नसता समता परिषद आपल्या पध्दतीने प्रत्युतर देण्यास सक्षम आहे असा इशारा ही वैद्य यांनी दिला आहे.
Leave a Reply