ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोना महामारीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल चंद्रकांत रत्नपारखे यांचा सत्कार

July 3, 202115:49 PM 24 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यात करोना महामारीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे यांनी गरजु लोकांना किराणा किट, धान्य, जेवणाची पाकीटे, रेडमिसिविर इंजेक्शन, बेड उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे या उपक्रमात चंद्रकांत रत्नपारखे यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांचा काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार राजेश राठोड, गटनेते गणेश राऊत, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहर अध्यक्ष शेख महेमुद यांच्या उपस्थितीत आमदार कैलास गोरंट्याल यांच्याहस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या वतीने मागील काही महिने लॉकडाऊन लागू केले होते. यामुळे गोर-गरीबांच्या हाताचे काम हिरावल्याने मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. रोज कमाई करून पोटाची खळगी भरविणारा लॉकडाऊनमुळे एकवेळचे जेवण देखील भेटत नव्हते अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे यांनी गरजु लोकांना धान्य व जेवणाचे पाकीटे वाटप करून मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, कल्याण दळे, सत्संग मुंढे, वसंत जाधव, राम सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *