मुरूड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) श्री संत राममारूती महाराज हे चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजातील एक थोर संत होऊन गेले. ईश्र्वर नाम भाषेचे जनक म्हणून आजही त्यांचे नाव अमर आहे. श्री संत राममारूती महाराज यांचा जन्म ८ सप्टेंबर १८५६ रोजी झाला.व त्यांचा निर्वाण दिन २८ सप्टेंबर १९१८ व या दिवशी अविधानवमी असल्याने या दिवशी त्यांचे पुण्यस्मरण म्हणून साजरा केला जातो.यानुसार चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज व देवस्थान ट्रस्ट मुरूड जंजिरा तर्फे ३० सप्टेंबर ( अविधाननवमी) या दिवशी सायंकाळी ६ -०० वाजता श्री लक्ष्मी नारायण मंदिरात आयोजित करण्यात आला. प्रथम समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक यांनी सर्व उपस्थिताचे शब्दसुमनाने स्वागत केले. माजी अध्यक्ष सुनील कुळकर्णी यांच्या हस्ते श्री संत राममारूती महाराज यांची पूजा करून हार अर्पण करण्यात आला.
आरतीचा मान संदेश मथुरे सहकार्य वाह यांना देण्यात आला.करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार मोजक्या माणसाच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला.या वेळी विश्वस्त विनोद चिटणीस, समाज बांधव उदय सबनीस, श्रीकांत दिघे उपस्थित होते. उपाध्यक्ष अशोक सबनीस यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली.
Leave a Reply