मुरुड जंजिरा (प्रतिनिधी, सौ नैनिता कर्णिक) चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्ट मुरुड तर्फे सालाबाद प्रमाणे या वर्षी ही सीमोलंघननाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नऊ दिवस श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आरती केली जाते.दसरा या दिवशी सायंकाळी श्री गणपती मंदिर, श्री भोगेश्वर मंदिर, श्री लक्श्मीनारायण मंदिर या ठिकाणी सीमोलंघननाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यातआला.
श्री गणपती मंदिर येथील पुजा समाज माजी अध्यक्ष सुनील कुळकर्णी, श्री भोगेश्वर मंदिर येथीआपट्रयाची पुजा सचिन राजे,श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील पुजा सुनील मोहिले यांच्या हस्ते करण्यात आली.याच वेळी आपट्यांची पाने देऊ देऊन सोने लुटण्याचा आनंद ही सर्वांनी घेतला. या वेळी समाज अध्यक्षा सौ नैनिता कर्णिक,उपाध्यक्ष अशोक सबनीस,सहकार्यवाह संदेश मथुरे , विश्र्वस्त विनोद चिटणीस, सौ सुप्रीया मथुरे स्नेहप्रभा महिला समिती उपाध्यक्षा विलासिनी चिटणीस ज्ञातीबंधु रमेश चिटणीस, भालचंद्र देशमुख, रविंद्र दिघे ,संदिप कुळकर्णी, विनय मथुरे प्रफुल्ल दिघे गजानन भोईर, संघटना सुथार, याच्या उपस्थितीत करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमानुसार कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. समाज अध्यक्षा यांनी दसरा निमित्त सर्वाना शुभेच्छा देऊन उपस्थितीचे आभार मानून सीमोलंघन कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply