मुरूड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज रायगड विभाग यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून महाड येथील ज्ञातीबांधवाना महाड समाज अध्यक्ष मा श्री रघुवीर देशमुख यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.
यावेळी मदत म्हणून गादी ,उशी, चादरी , चटया, सीलींग फॅन,LED बल्ब, महिलांसाठी आवश्यक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रायगड विभाग समाज संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष राजे, उपाध्यक्ष श्री प्रदिप श्रुंगारपुरे, सचिव श्री अशोक प्रधान याचवेळी अखिल भारतीय चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज मध्यवर्ती संस्थेचे कार्यकारी संचालक मंडळ सदस्य श्री आशीष गुप्ते व महाड येथील ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाड समाज अध्यक्ष श्री रघुवीर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply