उरण( संगीता ढेरे ) उरण – रायगड : उरण तालुक्यातील आसपासच्या खेडे गावातील जनमाणसांसाठी जवळची बाजारपेठ म्हणजे उरण हिच एकमेव बाजारपेठ होय. कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता आल्याने , त्याचप्रमाणे श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा आणि काही दिवसांच्या आत येणारा गणेशोत्सव यामुळे खरेदीसाठी लोकांची गर्दीच गर्दी शहरातील बाजारपेठेत दिसत आहे. उरण मधील चार फाटा म्हणजे चारही बाजूने वाहनांची होणार्री ये-जा, त्याचप्रमाणे जवळ असलेला एसटी बस स्टॉप आणि एन.एन. एम.टी.चीही येजा सतत होत असते. दिवसभर वाहनांची रेलचेल असलेल्या या मोक्याच्या चौकाची अवस्था पाहाल तर अगदी या चार फाट्यावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दोन चाकी प्रवाशांना तर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कारण एक एक खड्डा पहाल तर त्या खड्ड्यांची खोली किती असेल हेही वरून पाहता समजत नाही. कारण पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेला हा खड्डा म्हणजे अपघातास कारण बनू शकत आहे.
त्यात आता काही दिवसाच्या अंतरावर आलेला हा गणेशोत्सव गणेशाच्या मूर्तीचे होणारे आगमन, व भाविकांची खरेदीसाठी गैरसोय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्त्याच्या अवस्थेकडे पहाता या खड्ड्यात दुचाकीस्वाराची गाडी जोराने आपटली जात आहे. त्यामुळे पाठ दुखी व कंबर दुखी चे आजार उद्भभवू शकत आहेत. अशा या महत्वाच्या जोडणाऱ्या चार रस्त्यांवर सिडको प्रशासन , सीडब्ल्यूसी प्रशासन, चाणजे ग्रामपंचायत आणि ओ.एन.जी.सी. प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व गणेशोत्सव येण्यापूर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अशी मागणी उरणच्या नागरिकांची आहे
Leave a Reply