ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चार्जिंगला फोन लावून बायकोशी गप्पा, तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 17, 202212:46 PM 40 0 0

भोपाळ : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर  बोलताना तरुणाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लावून तरुण आपल्या बायकोशी बोलत होता, त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सध्या मुंबईत  राहणारा 25 वर्षीय सुजीत विश्वकर्मा फर्निचरच्या कामासाठी मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गेला होता. त्यावेळी ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?
सुजीत विश्वकर्मा घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईला परतणार होता. मात्र आदल्या रात्रीच त्याचा करुण अंत झाला. पत्नीशी फोनवर बोलताना त्याला विजेचा धक्का लागला. इंदौरच्या विक्रम हाईट्समध्ये ही घटना घडली आहे.
फर्निचरच्या कामासाठी मध्य प्रदेशला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी सुजीतचं लग्न झालं होतं. मूळ उत्तर प्रदेशातील हे कुटुंब असून सध्या मुंबई जवळच्या नालासोपारा परिसरात राहतं. इंदौरमध्ये तो फर्निचरचं काम करण्यासाठी गेला होता. मंगळवारी संध्याकाळी काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळीच तो मुंबईला येण्यासाठी निघणार होता. मात्र उशिर झाल्याने त्याला इंदौरमध्येच थांबावं लागलं. जेवल्यानंतर सुजीतने मोबाईल चार्जिंगला लावला आणि तो पत्नीशी फोनवर बोलत होता.

विजेचा धक्का बेशुद्धावस्थेत
सुजीत विश्वकर्मचा भाऊ संजयने दिलेल्या माहितीनुसार सुजीत आठवडाभरापूर्वी इंदौरच्या शोरूममध्ये फर्निचरच्या कामासाठी तो गेला होता. रात्री सुजीतने मोबाईलचा चार्जर मागितला. त्यानंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. इलेक्ट्रिक बोर्डमध्ये मोबाईल चार्जिंगला लावून तो फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याचा ओरडण्याचा आवाज आला. संजयने खोलीत जाऊन पाहिलं असता तो बेशुद्धवस्थेत पडला होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *