ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोणताही खाद्य पदार्थ घेताना त्याची कालमर्यादा तपासून घ्या

June 30, 202212:14 PM 21 0 0

उरण (तृप्ती भोईर)  : कोणतेही खाद्यपदार्थ घेताना काळजीपूर्वक त्या पदार्थांच्या पॅकींग वरील तारखेची मर्यादा तपासून घेणे आवश्यक आहे. आणि त्यात पावसाळा या ऋतूमध्ये तर खाण्याच्या पदार्थावर बुरशी येणे, आळी पडणे याचे प्रमाण फार जास्त असते. शक्यतो ऋतू कोणताही असो परंतु ताजे व पौष्टिक आहार घेणे केव्हांही आरोग्यासाठी हितकर असते.

दि. २९ जून  २०२२ बुधवार रोजी उरणमधील करंजा येथील रहिवासी निखिल म्हात्रे यांच्या बाबतीत असच काहीसं घडलं आहे उरणमधील राधिका डेरी या डेरीमधुन खरेदी केलेल्या ब्रेड च्या पॅकेट ची कालमर्यादा न पाहिल्यामुळे त्यांच्या घरी गेल्यावर लक्षात आले की , त्यांनी खरेदी केलेल्या ब्रेड च्या पॅकेट ची वैधता संपलेली होती आणि ब्रेडचा पुडा फोडताच त्यांच्या लक्षात आले की, ब्रेडची वापरण्याची तारीख निघून गेली होती आणि आतील ब्रेडला बुरशी पकडलेली होती .आणि त्यातील एक ब्रेड ही त्यांच्या मुलाने खाल्ला हे पहाताच त्यांना संताप आला व तसेच त्यांनी तो खरेदी केलेला ब्रेडचा पुडा घेऊन उरणमधील राधिका डेरी मध्ये डेरी च्या मालकास याबाबत विचारणा केली की, तुम्ही शिळे झालेले खाद्य पदार्थ विक्री साठी कसे ठेवता? त्यांना या गोष्टीची चीड आली दुकानात थोडीशी बाचाबाची झाल्याने दुकानाचा मालक त्या ब्रेड च्या पॅकेट चे पैसे परत करण्यास तयार झाला पण निखिल म्हात्रे यांनी त्यास नकार दिला .

वापरण्याची तारीख निघून गेलेला, आणि बुरशीजन्य पदार्थ खाण्यात आला आणि त्याची पोटाला इजा झाली तर यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *