जालना (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संघर्ष नगर इंदेवाडी येथे प्राचार्य राजकुमार म्हस्के यांचा व्याख्यानाचा विशेष कार्यक्रम फकिरा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता.
बोलतांना राजकुमार म्हस्के असे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीला सोबत बंधु भावासम वागणूक देवून रयतेचे राज्य निर्माण केले होत या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वतंत्रयाने जिवन जगत होती याचे कारण रयतेमध्ये समता होती न्याय होता स्वातंत्रय होत. शेती गडे व सर्वसामान्यांचे जिवनमानासाठी छत्रपती अहोरात्र झटत होते छत्रपतींना सहा भाषेचे ज्ञान होते आपल्या कुशल शौर्यवान व्यक्तीमत्वाची छाप त्याकाळी छत्रपतीनी सर्वसामान्य मानसावर उमटवली होती त्यामुळे त्यांच्या तेजस्वी चेह-यावरील स्मित हास्य पाहुन कुणीही रागीट क्रोधीत, त्यक्तीचे मन गार झाडाच्या सावली सारखे होत असे. छत्रपती सर्वांचे देवत गणल्या जाई.छत्रपत्तीनी पाप पुण्यांची व्याख्या अशी केली होती की,रयतेची मदत सेवा करणे म्हणजेच पुण्य् आणि रयतेला वा-यावर सोडणे म्हणजे पाप होय असे महाराजांच्या विचारांची निर्मीती छत्रपतींनी त्याकाळी केली त्यामुळे त्यांचे जिवनकार्य विश्वासाठी आदर्श ठरून त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यावर देशविदेशात अभ्यासक्रम आणि संशोधन केल्या जात आहे त्यामुळे भारतीयांना या सुपुत्राने भारतामध्ये जन्म घेतल्याने सार्थ अभिमान आहे.त्यामुळे आपन सर्वघटकांनी त्यांच्या विचारांना समजुन घेवून आज भारतीय संविधानानुसार छत्रपतींचे रयतेचे राज्यूनिर्माण कराव डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहीते वेळी छत्रपतींचे रयतेचे राज्य डोळयासमोर उभ होत त्यामुळे भारतीय संविधान लिहायला सोप गेल असे उदगार काढले होते.
छत्रपतींचा लढा हा कुण्या एका धर्मासाठी नव्हता जातीसाठी नव्हता तर मानसाच्या सन्मानासाठी त्यांच्या स्वातंत्रयासाठी होता हे जाणून छत्रपतींना प्रत्येक धर्मातील जातीतील लोकांनी समजून घेतलं पाहिजे. कार्यक्रमाचे अदयक्ष रमेश डोळसे तर उदघाटक तांदुळवाडी सरपंच अण्णासाहेब चित्तेकर, वाघोळा उपसरपंच ज्ञानदेव घुगे, कपील खरात , सुरेश उघ् डे आयोजक – फकीरा वाघ तर संयोजक – देविदास वाघ ,बाळु बोर्डे,अरुण सुर्वे,मनोहर उघ् डे ढापसे साहेब, बारड साहेब, प्रभु मनवर, सुनिल निकाळजे,गणपत कांबळे,सिंधुताई वाघ,सुहास साळवे,विनोद वाघ,विकास वाघ आदी उपस्थित होते याप्रसंगी मोठया संख्येने महिला नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply