ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पेटून उठलेले तरुण इतिहास घडवतात – ज्योतीताई राऊत

February 24, 202122:57 PM 85 0 0

जालना (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव जरी घेतले तर अंगात स्फर्ती निर्माण होते, त्यांचे विचार म्हणजेच इतिहास निर्माण करणारा ज्वालामुखी आहे. त्यांच्या विचाराने पेटून उठलेले तरुण नक्कीच इतिहास घडवतात असे प्रतिपादन मौजपुरीच्या सरपंच सौ. ज्योतीताई भागवत राऊत यांनी केले.


मौजपुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेे. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भागवत राऊत, उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, बद्रीनारायण भसांडे, बंडू काळे, सत्यनारायण ढोकळे, संतोष मोरे, नारायण गायकवाड, राम जाधव, विष्णू डोंगरे, माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, बालाजी बळप, बंडू डोंगरे, अच्युत मोरे, निवृत्ती जाधव, बाळीराम गायकवाड, विष्णूबप्पा डोंगरे, मनोहर मोरे, सुनिल मोरे, प्रभाकर गायकवाड, अंकुश काळे, पांडूरंग डोंगरे, माऊली काळे, जालींदर मोरे, प्रदीप मोरे, विष्णू कांबळे, दत्ता काकडे, रामदास गायकवाड, बबनराव मोरे, दत्ता गायकवाड, कृष्णा हिवाळे, समाधान हिवाळे, मनोहर अटोळे, प्रकाश थोरात, बंडू थोरात यांची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आजकालची तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे. परंतु त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कळाले तर व्यसनाच्या आहारी जाणारी पिढी आपोआप निर्व्यसनी होईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पेरणी तळागळापर्यंत झाली पाहीजे तसेच त्यांच्या विचारधारेची पिढी निर्माण झाली पाहिजे असेही सौ. ज्योतीताई भागवत राऊत यांनी म्हटले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *