ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लहान मुलांनी जंक फुड व कोल्ड्रींक टाळावी: डॉ. विभा लाहोटी

April 16, 202215:11 PM 31 0 0

जालना प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन यांच्यावतीने रोटरी परिवारातील सदस्यांच्या मुलांसाठी डॉ. लाहोटी मल्टीस्पेशालिटी डेन्टल केअर, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, राम मंदिरच्या बाजुला, जालना येथे दि. १५ एप्रिल २०२२ शुक्रवार रोजी मोफत दंतरोग चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात अनेक मुलांनी त्यांचे दंत्त तपासून घेतले व त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात डॉ. विभा लाहोटी तथा डॉ. प्रतिक लाहोटी यांनी दंत काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
एम. डी. एस. डेन्टल डॉ. प्रतिक लाहोटी व बाल दंतरोग चिकित्सक तथा एम. डी. एस. डॉ. विभा लाहोटी यांनी प्रतिपादन केले की, लहान मुलांनी सकाळी व रात्री दोन वेळेस ब्रश करावा व जेवणानंतर गुळणी करावी. तसेच अधुन मधुन स्नॅक्स किंवा जंगफुड टाळावे. लहान मुलांच्या दंत्तामध्ये चिप्स अडकु शकते, त्यामुळे कीड सुद्धा लागु शकते. सहसा मुलांना रडल्यावर जंक फुड, चॉकलेट किंवा कोल्ड्रींक दिली जाते व ते खाल्याने ते गुळणी करत नाही व त्यांच्या दातांना किड लागते. यामुळे ही सर्व गोष्ट पालकांनी टाळावी व दर सहा महिण्याला मुलांचे दंत्त तपासून घ्यावे.
या शिबीरात रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊने अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, सचिव प्रशांता बागडी, रो. मधु राठी, रो. गौरव मोदी, रो. पियुष अग्रवाल, स्थानिक महिला तक्रार समितीच्या अध्यक्षा अॅड. अश्विनी धन्नावत, अॅड. बॉबी अग्रवाल ई. उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *