ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बालकांनो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करा – जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

June 16, 202112:42 PM 26 0 0

जालना :- जालना शहरातील शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी आज दि. 15 जुन रोजी अचानक भेट देऊन पहाणी केली. या बालगृहातील प्रत्येक बालकाच्या संरक्षणाबरोबरच बालकांना त्यांच्या पाल्यांची उणिव भासणार नाही यादृष्टीने पालकांप्रमाणे त्यांची काळजी घेण्याचे निर्देश देत शिक्षणामध्ये खुप मोठी ताकद असुन उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक बालकाने जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या भेटीप्रसंगी बालन्यायमंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी व्ही.एस. यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती संगिता लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, मानसोपचार तज्ज्ञ श्रीमती दीपाली मुळे, बालकल्याण समितीचे सदस्य डॉ. मनोहर बन्सवाल, शासकीय निरीक्षणगृहाचे अधीक्षक अमोल राठोड आदी उपस्थित होते.

बालकांच्या संगोपनामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या

जालना शहरातील शंकरनगर येथेअसलेल्या शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी भेट देत निरीक्षणगृहाची पहाणी केली. विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पहाणी करत या बालकांच्या संगोपनामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या. तसेच या बालगृहासाठी कुठल्या बाबींची कमतरता असेल तर प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येक बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी. बालकांना ताप,सर्दी, खोकला, यासारखी काही लक्षणे असतील तर तातडीने त्यांच्यावर उपचाराची सोय करण्यात यावी. बालकांना या निरीक्षणगृहात देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम ठेवण्याबरोबरच या निरीक्षगृहातील प्रत्येक खोल्यांची तसेच परिसरातील नियमितपणे स्वच्छता ठेवण्यात यावी. निरीक्षणगृहामध्ये काम करत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्वरेने पुर्ण करुन घेण्याच्या सुचना करत या निरीक्षणगृहामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पहाणीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केली.

निरीक्षण गृहातील बालकांशी संवाद साधत केली आस्थेवाईकपणे चौकशी

निरीक्षणगृहामधील बालकांशीही जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन या बालकांना बोलते केले. या निरीक्षणगृहामध्ये तुम्हाला वेळेवर जेवण दिले जाते काय, जेवण चांगले असते का, तुमच्या आरोग्याची तपासणी नियमितपणे केली जाते काय, तुम्हाला मोठे होऊन काय व्हायचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत मायेने व आस्थेवाईकपणाने विचारलेल्या प्रश्नांना बालकांनीही तेवढ्याच उत्स्फुर्तपणे उत्तरेही दिली.

आजची बालके हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या तसेच स्पर्धेच्या या युगात शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. शिक्षणामध्ये मोठी ताकद असुन शिक्षणाशिवाय कोणाचीच प्रगती होऊ शकत नाही. आपली स्वप्ने पुर्ण करण्याची ताकद केवळ शिक्षणामध्ये असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांने जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करावा. शिक्षणाबरोबरच आरोग्यही तेवढेच महत्वाचे असल्याने प्रत्येकाने योग्य आहार व नियमितपणे व्यायाम करण्याची सवय अंगिकारण्याबरोबरच आयुष्यात प्रगती करण्यासाठी नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवण्याबरोबरच समाजाला आपलेही काही देणे लागते या विचाराचा आयुष्यात कधीही विसर पडु देऊ नका असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *