ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वनभोजनातून चिमुकल्यांनी घेतला निसर्गशाळेचा आनंद!

January 7, 202213:27 PM 54 0 0

नांदेड – ‘बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरु
झाडे, वेली, पशू-पाखरे
यांच्या गोष्टी करु’
या गदिमांच्या कवितेप्रमाणे शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. गत दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने सर्व शालेय उपक्रम स्थगित करण्यात आले होते. आता शाळा सुरळीत झाल्याने जिल्हा परिषदेच्या जवळा दे. येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.

मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, मिमीक्री, प्राण्यांचे हुबेहुब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मनोरंजक व मैदानी खेळात सहभाग घेतला. तसेच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, वापरण्यात येणारी पारंपारिक अवजारे व शेतीच्या पारंपारिक तथाआधुनिक पद्धती यांची प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्यात आले. विविध इयत्तांच्या व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभती दिल्या. निसर्ग शाळेत एकूण ५४ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
शिक्षकांनी शेती करण्याच्या पद्धती व अवजारे यांच्याविषयी माहीती दिली. बैठे व मैदानी खेळ घेतल्यानंतर हिरव्यागार वनराईच्या संगतीत रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष मध्यान्ह भोजनावर ताव मारला. सदरील उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, सहशिक्षक एस.एम. घटकार यांनी केले होते. तर आप्पाराव शिखरे, वंदना शिखरे, नारायण शिखरे, हैदर शेख, कमलबाई गच्चे, मारोती चक्रधर, आनंद गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.
काय पाहिले?
औषधीयुक्त वनस्पती, पाण्याचे विविध स्त्रोत, रब्बी हंगामातील जोंधळा, मक्का, भुईमुग, गहू, हरभरा, हळद आदी पिकांची शेते, विविध फळांची झाडे, मातीचे प्रकार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच कालव्याद्वारे पाणी पुरवठा, पाटाचे पाणी, गांडूळ खत प्रकल्प, रानटी झुडपे, विविध पक्षी आणि त्यांचे आवाज , घरटी आदीं बाबींचे निरीक्षण करण्यात आले. तसेच शेंगा, चारं, बोरं, ऊसाची टिपरे, पाडाच्या चिंचा, पेरु, मधमाशांचे पोळे या रानमेव्यांचा आस्वाद घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *