ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिमुकल्यांच्या वाढदिवसाचे पैसे श्रीराम मंदिर उभारणीस समर्पित! बिल्होरे परिवाराचे सर्वस्तरातून कौतूक

February 9, 202114:17 PM 13 0 0

जालना : दोन चिमुकल्या बालकांच्या वाढदिवसाचे पैसे बिल्होरे परिवाराने अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस समर्पित करुन खारीचा वाटा उचलला आहे. दरम्यान, बिल्होरे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

आज मंगळवारी वेदश्री ईश्‍वर बिल्होरे व राजनंदनी नंदू बिल्होरे या हिंदू महासभाई परिवारातील दोन चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च सदुपयोगी लागावा या उदात्त हेतूने श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानचे अध्यक्ष घनशामदास गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी दोन्ही बालकांनी जय राम म्हणत चिमुकल्या हातांनी सदरील निधी समर्पण करुन श्रीराम मंदिर हेच राष्ट्र मंदिर असाच संदेश देऊन धर्म बांधवांकडून आशिर्वादरुपी कौतूकाची थाप मिळवली. याप्रसंगी उद्योजक गोपाल गोयल, हिंदू महासंभेचे ईश्‍वर बिल्होरे, अशोक बिल्होरे यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *