नांदेड – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी केवळ विचार दिले नाहीत तर त्यांनी आपल्या कृतीतून लोकांना मानवतावाद शिकवला. आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अनुकरण करणाऱ्या जवळा येथील चिमुकल्यांनी गाडगेबाबा
यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय स्वच्छता अभियान राबवून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, सम्राट वाचनालयाचे संस्थापक भैय्यासाहेब गोडबोले, आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले, ज्येष्ठ नागरिक हैदर शेख उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेऊन शाळा भरवल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने जवळा येथील प्राथमिक शाळेत चिमुकल्यांनी हातात खराटा घेऊन परिसर स्वच्छ केला. वर्गखोल्या, स्वच्छता संकुल, डिजिटल वर्गखोली, कार्यालय आदींची स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच कमलताई शिखरे, ग्रामपंचायत सदस्य शंकर गच्चे, मारोती चक्रधर, मिलिंद गोडबोले, रत्नदीप गच्चे, दीपक सिंह गव्हाणे, बालचंद गोडबोले यांची उपस्थिती होती. गावातील सम्राट सार्वजनिक वाचनालयातही गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वसंतअण्णा शिखरे,जवळा येथील सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, ग्रा.पं. सदस्य माधवराव पावडे, जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक ढवळे सर, आकाशवाणी केंद्र नांदेडचे उद्घोषक आनंद गोडबोले, सूरज शिखरे, भैय्यासाहेब गोडबोले,आदिंची उपस्थिती होती.
देगावचाळ येथील बुद्ध विहारात गाडगेबाबा जयंती
शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात चिमुकल्यांनी स्वयंप्रेरणेने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी केली. गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनुष्का लोणे, विजया हटकर, अस्मिता नरवाडे, अनुष्का नवघडे, अवंती कदम, शितल लोखंडे, हर्षदीप लोखंडे, कुंदन सोनकांबळे विनोद कापुरे, शिल्पा लोखंडे, शोभाबाई गोडबोले, छायाबाई थोरात, जिजाबाई खाडे, गयाबाई नरवाडे, ज्योतीताई हिंगोले, संदीप ठोके, सुदीप गोडबोले, सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply