ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिञपट अविरतचे पोस्टर प्रदर्शन

January 11, 202212:05 PM 52 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हददीतील कोंढरी येथील ढरीचे नृत्य दिग्दर्शक तथा कलाकार श्री मिलिंद भाऊ म्हाञे आणि श्री. राजेश पवार निर्मित आणि मिलिंद म्हात्रे लिखित व दिग्दर्शकीत आगामी अविरत या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन नुकताच कोंढरी गावचे आराध्य दैवत श्री हनुमान मंदिरात मिलिंद म्हात्रे यांचे आई वडील यांच्या शुभहस्ते कोविडचे सर्व नियम बाळगून पार पडला .

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजा मछ्चिमार सोसायटीचे माजी चेअरमन श्री शिवदास नाखवा हे होते तर प्रमुख उपस्थिती निर्माते श्री राजेश पवार, चाणजेचे सरपंच श्री मंगेश थळी, विद्यमान सदस्य श्री अमितजी भगत, श्री व्यंकटेश म्हाञे, माजी सदस्य श्री महेश म्हाञे,सौ.पल्लवी ठाकूर, गीतकार विश्वास पाटील,कलाकार अरूण म्हाञे, आकाश भोईर, सुरेश चव्हाण,
हर्षवर्धन धामणकर, सोमनाथ ठाकूर, विनोद म्हाञे, दिपा ठाकूर ,विद्या ठाकूर तसेच मिलिंदजी म्हाञे यांचे सर्व शिष्यगण व त्यांचे आईवडील उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोंढरीसारख्या गावातून वडापावची गाडी चालवून उदरनिर्वाह करणारे आईवडीलांचा मुलगा एका सिनेमाची निर्मिती करतोय याबद्दल मिलिंदजी यांचे कौतुक आणि आगामी अविरत हा सिनेमा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होवो या सदिछ्च्या दिल्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री होळकर गुरूजी आणि चेतन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंदजी म्हाञे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान कलामंचने विशेष सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *