उरण (संगीता ढेरे) ः उरण तालुक्यातील चिरनेर गाव पावसाच्या पाण्यामुळे पुराच्या विळख्यात अडकल्याने गावात हा-हा-कार माजला आहे. नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरीकांना रात्र जागून काढावी लागत आहे. तर अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चिरनेर गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. परंतु आज याच गावात पाणी शिरल्यान मोठी अडचण निर्माण झाली आहे. उरण शहर, तालुक्यातील अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. त्यात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उरण – नवघर, जेएनपीटी, तसेच कंठवळी- वेश्वी हा रहदारीचा रस्त्या देखील पाण्याखाली गेला. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.
उरण तालुक्याला गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार्यां उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले आहे. उरण शहर तसेच आजूबाजूच्या गाव-परिसरात पुरांचे पाणी शिरले आहे.
एकंदरीत पावसाने उरण तालुक्यात तांडव घातले असून समस्यांचेही थैमान सुरु आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी, तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकार्यांनी शासकीय आदेशाचे पालन करुन उपायोजना करण्या एैवजी आप-आपल्या कुटुंबासह घरीच असल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना विचारणा केली असता मी पुर परिस्थितीची माहिती घेत आहे. तसेच जे अधिकारी कर्मचारी जनतेला सहकार्य करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करणार असून पुर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधिताना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. असेही तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगीतले.
Leave a Reply