ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिरनेर च्या सी आर पी व बँक सखी बचत यांनी महाड येथील पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

August 4, 202112:35 PM 41 0 0

उरण (संगिता पवार ) महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला मुसळधार पावसामुळे सावित्री ,गांधारी ,आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी औधोगिक परिसरात प्रवेश केला या मुळे पूरस्थिती निमण झाली परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि दुकानंत पाणी शिरले .

महाड मधील पूरग्रस्तांसाठी उरण तालुक्यातील चिरनेर गावातील सीआरपी शकुंतला देविदास चीर्लेकर ,सीआरपी सोनाली संतोष जाधव व बँक सखी अंजली रवींद्र चीर्लेकर त्याच प्रमाणे जाणता राजा महिला ग्रामसंघ चिरनेर ,छत्रपती शिवाजी महाराज महिला ग्रामसंघ चिरनेर, शिव छावा महिला ग्रामसंघ चिरनेर यांच्या मधून 52 बचत गटा मिळुन मदतीचा हात दिला आहे . त्यांनी महाड मधील पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भेट घेऊन तांदुळ १५० किलो , साखर ५० किलो , मुगडाळ ३० किलो, गव्हाचे पीठ १०० किलो ,टोस्ट १०० पॅकेट ,बिस्कीट ७०० पॅकेट ,अंगाचे साबण १०० ,मच्छर अगरबत्ती १०० पॅकेट ,मीठ १०० पॅकेट आदी जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला आहे .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *