ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिरनेरच्या तरुणाला आयपीएल ड्रीम इलेव्हन टीम मध्ये ३५ लाखांचे बक्षीस

February 17, 202213:11 PM 39 0 0

उरण (संगिता पवार ) : कोणाचे नशीब कसे खूलतील हे सांगता येत नाही.चिरनेरच्या अशाच एका क्रिकेट वेड्या तरुणाला सध्या सुरू असलेल्या आय पी एल स्पर्धेने धनवान केले आहे.त्याने लावलेल्या ड्रीम इलेव्हन टीमवर त्याला ३५ लाखांची लॉटरी लागली आहे.भाविकांचा श्रध्दास्थान असलेला चिरनेर गावातील श्री महागणपती पंकज ठाकूर या तरुणाला पावला आहे.
आयपीएल स्पर्धेत उरण तालुक्यातील चिरनेर येथिल पंकज संतोष ठाकूर या क्रिकेट वेड्या तरुणाने स्पर्धेतील नियमानुसार आँस्टलीया व श्रीलंका येथील खेळाडू घेऊन ऑनलाईन ड्रीम इलेव्हन टीम तयार केली. व ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला.ड्रीम इलेव्हन टीम मधिल खेळाडूं केल्यानुसार त्यांना पॉईंट्स देण्यात येतात. ज्याने योग्य टीम तयार करून त्यातील खेळाडूंना जास्त पॉईंट मिळाले की त्या स्पर्धकाला १०० रुपयां पासून एक करोड रुपयां पर्यंत बक्षीस दिले जाते.त्यानुसार चिरनेरच्या पंकज संतोष ठाकूर या तरुणाला तब्बल ३५ लाख रुपयांचे बक्षिस मिळाले आहे.
चिरनेर गावातील श्री महागणपती मंदिराचे ट्रस्टी असणारे संतोष ठाकूर यांची महागणपती देवस्थानावर अपार श्रद्धा आहे.अशा संतोष ठाकूर यांचा पंकज हा मूलगा असून त्यांनी या अगोदर आपल्या कुटुंबाच व गावाच नाव युट्यूब च्या माध्यमातून सातासमुद्रापार भरारी घेऊन सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले आहे.त्यात पंकज संतोष ठाकूर यांना ड्रिम इलेव्हन टीमच्या माध्यमातून ३५ लाखाचे पारितोषिक मिळाल्याने सर्वस्तरातून पंकज ठाकूर व त्याचे आई वडील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सामान्य घरातील असलेल्या पंकजने या पैशांचा योग्य विनियोग करण्याचा मानस व्यक्त केला आहे.या अगोदर ही चिरनेर गावातील संकेत विजय मुंबईकर या तरुणाला ड्रिम इलेव्हन टीमच्या माध्यमातून १५ लाखाचे पारितोषिक मिळाल्याने होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *