ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कौशल्‍य आत्‍मसात करुन वेगळ्या वाटा निवडा : पुरूषोत्तम खेडेकर

December 5, 202114:04 PM 60 0 0

जालना : आधुनिक युगात प्रत्‍येकाने वेगवेगळे कौशल्‍य आत्‍मसात करुन वेगळ्या वाटा निवडून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. भविष्य खुप स्‍पर्धात्‍मक असून, समाजापुढे मोठी आव्‍हाने असल्‍याने त्‍याला तोंड देण्यासाठी प्रत्‍येकाने सज्ज राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्‍थापक अध्यक्ष शिवश्री ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले. भाग्यनगर येथील मराठा सेवा संघ येथे शुक्रवारी (ता.३) कुटूंब स्‍नेहमिलन मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रामकिसन पवार, जिल्‍हाध्यक्ष संदिपान जाधव, शहराध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत तेलगड, जिजाऊ ब्रिगेडच्‍या जिल्‍हाध्यक्ष विभावरी ताकट, जिल्‍हा सचिव काकासाहेब खरात यांची विचारपीठावर प्रमुख उपस्‍थिती होती.

या प्रसंगी बोलताना ॲड. खेडेकर यांनी समाजातील विविध विषयावर उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. पारंपारिक जीवनशैली, व्‍यवसाय याला फाटा देवून नवीन बदल आत्‍मसात करुन त्‍यानुसार आपली कार्यपद्धती बदलण्याची आज गरज आहे. आज प्रत्‍येकाला नोकरी मिळणे शक्‍य नसल्‍याने रोजगाराच्‍या नव्‍या वाटा शोधणे गरजेचे आहे. त्‍याचबरोबर व्‍यवसायिक दृष्टीकोन ठेवून लहान-मोठे व्‍यवसाय करण्यावर भर द्या, व्‍यवसाय कोणताही असो लाज बाळगू नका. त्‍याचप्रमाणे समाजातील नागरिकांनी जे शक्‍य आहे त्‍या पद्धतीने एकमेकांना मदत करावी असे आवाहन करुन तुम्‍ही कोण आहात त्‍यापेक्षा तुम्‍ही कोठे आहात याचा जास्‍त महत्‍व असल्‍याचेही ते म्‍हणाले.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री. तनपुरे यांनी मराठा सेवा संघ राबवित असलेल्‍या उपक्रमाची उपस्‍थितांना माहिती दिली.
प्रास्‍ताविकात शहराध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत तेलगड शहर कार्यकारिणीच्‍या ध्येय धोरणाची माहिती दिली. जिल्‍हाध्यक्ष संदिपान जाधव, विभावरी ताकट यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमास आर. आर. खडके, अंकुशराव राऊत, ज्ञानदेव पायगव्‍हाणे, तुळशीराम शेळके, प्रा. सोपानराव तेलगड, इंजि. रोहित देशमुख, शिवाजी तनपूरे, जगन्नाथ गारूळे, मनिष राऊत, प्रा. डॉ. बप्पासाहेब मस्‍के, पंढरीनाथ मते, डॉ. क्रांतीसिंह लाखे पाटील, संतोष गाजरे, भरत मानकर, डॉ. प्रताप वझरकर, प्रसाद वाढेकर, कृष्णा शेळके, अभय पवार, सुरज पवार, सर्जेराव थोरात, निवृत्ती मावसकर, दिपक काळे आदींची उपस्‍थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *