ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नृत्य दिग्दर्शक नितीन पाटील यांचे दु :खद निधन

March 31, 202214:26 PM 38 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण तालुक्यातील : भेडखळ येथील रुद्राक्ष डान्स अकॅडमी चा संस्थापक, नृत्य दिर्गदर्शक नितीन पाटील यांचें नुकताच अल्पशा आजाराने दु,:खद निधन झाले.नितीन पाटील यांनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा चित्ररथावर नितीनच्या टीमने नृत्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले होते.त्यामध्ये पंढरीची वारी साकारून प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला होता.त्यामूळे त्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या नृत्यकलेची फार मोठी हानी झाली आहे.
नितीन पाटील हा प्रेमळ व शांत स्वभावाचा होता.त्याने आपल्या नृत्या ने महाराष्ट्राचे नाव दिल्ली तख्तावार पोहचविले होते. तर अनेक नवोदित नृत्य कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन करुन घडवीले होते. केवळ उरण किंवा रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असंच नितीनच नृत्यक्षेत्रातील योगदान आहे. त्याच्या अकाली जाण्याने नृत्यकला क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.नवोदितांना नितीनच कुशल मार्गदर्शन मिळणार नाही. नितीनचे दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी माणकेश्वर उरण येथे 10 वाजता होणार असून उत्तर कार्य रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 भेंडखळ येथील राहत्या घरी होणार आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *