ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ई-श्रम कार्ड चा लाभ जालना जिल्हयातील नागरीकांनी घ्यावा-भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे

September 28, 202115:06 PM 4 0 0

जालना (प्रतिनिधी):- केंद्र शासनाने ई-श्रम कार्ड योजना राबवून सर्व सामान्य नागरीकांना योजनेचे लाभ देण्याचा उद्देश केंद्र सरकारचा असून यासाठी जालना जिल्हयातील सर्व पात्र नागरीकांनी ऑनलाईन ई-श्रम कार्ड काढून लाभ घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांनी शहरातील प्रभाग 22 व 23 मधील लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड वाटप प्रसंगी केले. जालना शहरातील प्रभाग क्र.23 च्या नगरसेवीका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.संध्याताई संजय देठे यांच्या प्रभागातील नागरीकांना ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत,जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे,नगरसेवीका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.संध्याताई देठे,सांस्कृती सेल जिल्हाध्यक्षा सौ.शुभांगीताई देशपांडे, स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते, प्रा.राजेंद्र भोसले,जिल्हा चिटणीस स्नेहाताई जोशी,प्रा.यास्मीन शेख, महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. उषाताई पवार,गणेश जल्लेवार, माजी नगरसेवीका सखुबाई पनबिसरे आदीची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे म्हणाले की, ई-श्रम कार्ड योजनेमध्ये केंद्र शासनाच्या विविध शासनाच्या योजनेचा लाभ या ई-श्रम कार्ड योजनेमुळे होणार असून त्यासाठी जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन भास्करराव पाटील दानवे यांनी केले.

यावेळी शहरात राजेश राऊत म्हणाले की, संपुर्ण जालना शहरातील पात्र नागरीकांनी ई-श्रम योजनेची नोंदणी करुन लाभ देण्याचे काम भाजपाकडून करण्यात येणार असून तसेच केंद्र सरकारच्या अन्य आरोग्य विषयक उपक्रम आयुष्यमान भारत कार्डचे वितरण शहरात राबविण्यात येणार असून जालना शहरातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले.
जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महीला आघाडीच्या प्रत्येक प्रभागात व वार्डात शाखा स्थापन करण्यात येणार असून आगामी नगरपालीका निवडणुकीमध्ये महीलांना जास्तीत जास्त ठिकाणी भाजपाकडून उमेदवारी देणेसाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी जालना शहरातील जास्तीत जास्त महीलांनी भाजपात नोंदणी करुन भाजपा महीला आघाडीच्या पाठीशी रहाण्याचे आवाहन केले. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखालीव केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरासह जिल्हयात महीला मोर्चाच्या शाखा उघडून महीलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सौ.संध्याताई देठे यांनी सांगितले. यावेळी जालना शहरातील रेल्वेस्टेशन जवळील आनंद नगर येथे भारतीय जनता पार्टी महीला मोर्चाची शाखा स्थापन करण्यात आली व यावेळी आनंदनगर वासीयांनी रेल्वेस्टेशन जवळील रेल्वे भुयारी मार्गास मंजूरी देऊन उदघाटन केल्याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे आनंदनगर व परीसरातील नागरकांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *