ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोककलेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात जनजागृती कलापथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

March 10, 202213:24 PM 45 0 0

जालना  : राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विकासकामांची व्यापक जनजागृती करण्यात येत असुन आज दि. 9 मार्च रोजी जालना, घनसावंगी व बदनापुर तालुक्यांमध्ये कलापथकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.
ईश्वरसेवा लोककला ग्रुप पथकाने घनसावंगी तालुक्यात, शाहीर विक्रम खरात कलापथक मंडळाने बदनापुर तालुक्यात तर शिवसम्राट सोशल ग्रुपने जालना तालुक्यातील गावांमध्ये लोकगीतं, भारूड, गवळण, बतावणी या माध्यमातून शासनाच्या विकास कामांची माहिती सरळ व सोप्या भाषेत नागरिकांना दिली. नागरिकांनीही या कलाथपकांना भरभरुन दाद दिली.
जालना जिल्ह्यातील बाजारपेठा आणि मोठ्या गावांत हा लोक जागर होईल. शासनाच्या योजना व विकासकामे अत्यंत सोप्या भाषेत लोकगीतं, भारूड, गवळण, बतावणी या माध्यमातून पोहचतील.. हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्या उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांनी ह्या कला पथकाचा जागर 9 मार्च ते 15 मार्च पर्यंत गावा -गावात ठेवला आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *