ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव अधिवेशनात मंजुर करावा शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांची मागणी

July 5, 202112:17 PM 30 0 0

जालना (प्रतिनिधी) ः मुस्लिम समाजाला तत्कालीन कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारने विधानसभेत 5 टक्के आरक्षण मंजुर केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे विधान परिषदेत आरक्षणाला अतिम मंजुरी मिळाली नाही. आणि त्यावेळच्या युती सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न बाजुला ठेवल्यामुळे मुस्लिमांना आरक्षण मिळू शकले नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने येत्या अधिवेशात मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केली आहे.


राज्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीची सत्ता असतांना कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी अल्पसंख्याक विकास मंत्री आरेफ नसिम खान यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मंजुर करण्यात यावे म्हणुन परिपुर्ण प्रस्ताव विधानसभेत ठेवला होता. हा प्रस्ताव विधानसभेत मंजुर होवून विधान परिषदेत आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यासाठी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारची मुद्दत संपल्यामुळे विधान परिषदेत हा प्रस्ताव मंजुर होवू शकला नाही. मध्यतरीच्या काळात मुस्लिम समाजाला मिळालेले आरक्षण देण्यात येवू नये म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकेवरील दोन्ही बाजुच्या पक्षकारांचे म्हणने ऐकुन राज्य शासनाने मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले होते. परंतु राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यामुळे या सरकाराने मुस्लिम आरक्षणाकडे कानाडोळा करुन भिजत घोंगडे ठेवले. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. समाजावर घोर अन्याय झाला असून महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाच्या तिव्र भावना लक्षात घेवून येत्या पावसाळी अधिवेशात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव मंजुर करुन घ्यावा अशी मागणी शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केली आहे. मुस्लिम आरक्षणाचे प्रणेते माजीमंत्री आरेफ नसिम खान यांची शेख महेमूद यांनी मागील आठवड्यात भेट घेवून आरक्षाबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे सांगुन समाजाला लवकरच न्याय मिळवून देण्याचे सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *