उरण ( संगिता पवार ) उरण नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत उरण नगरपरिषदेचे विमला तलावाची स्वच्छता शुक्रवार ( दि. ८ ) रोजी करण्यात आली . या वेळी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्क्ष जयविन कोळी ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर , भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,, आरोग्य सभापती यास्मिन गॅस ,मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ,नगरपरिषद कर्मचारी ,सफाई कामगार ,नागरीक ,युवक आदी उपस्थित होते .सर्वांनी सहकार्य केले .
तलावातील प्लास्टिक कचरा व निर्माल्य तलावाबाहेर काढून तलाव साफ करण्यात आला संतोष माळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना दिले युवकांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र दिले व सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले व असे कार्यक्रम करावे व जनजागृती करावी आणि उरण स्वच्छ ठेवावे या साठी आवाहन केले.
Leave a Reply