ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

July 19, 202112:34 PM 20 0 0

जालना दि. 18- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दि. 18 जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या 100 खाटांच्या मॉड्युलर हॉस्पिटलचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.


यावेळी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, मॉड्युलर आयसीयूचे नोडल अधिकारी डॉ. संजय जगताप, प्र. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन पवार, प्र. प्रशासकीय अधिकारी नोडल अधिकारी ऑक्सिजन डॉ. संतोष जायभाये, नेत्रतज्ञ वर्ग-1 डॉ. उदयन परितकर, मंगेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी 100 खाटांच्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या कामाचा तपशीलवार आढावा घेवून या कामावर कामगाराची संख्या वाढवत दिवस व रात्रपाळीमध्ये काम करुन ते वेगाने पुर्णत्वास नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याची शक्यता पाहता पीएसए व लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे कामही तातडीने पूर्ण करत द्रवरुप ऑक्सिजनचा साठा जिल्ह्यासाठी राखुन ठेवण्यात यावा. तसेच जंबो-डॅयुरा सिलेंडरची मागणी करुन तेही उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या सर्जिकल आयसीयुचीही पाहणी करून हे कामही त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्हा रुग्णालयातील बांधकाम,नेत्र रोग कक्ष, ऑपरेशन थिएटर, पि.एम. रुम अशा सर्व ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन बांधकामाची प्रगती जाणुन घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *