ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधीतून कोव्हीड सेंटरसाठी 1 कोटीचा निधीजिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिली मंजुरी

April 26, 202113:41 PM 81 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील अग्रसेन फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून 1 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी आज या प्रस्तावाला मंजूरी दिली.जालना येथील अग्रेसन फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या 100 बेडच्या कोव्हीड सेंटरचे उदघाटन आज रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला आ. कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून अग्रसेन फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य खरेदीसाठी 1 कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव दिला होता. सदर प्रस्तावाला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सुचनेवरून जिल्हाधिकारी बिनवडे यांनी आज रविवारी अंतिम मंजूरी दिली आहे. या 1 कोटी रूपयांच्या निधीतून 100 ऑक्सिजन सिंलेडर, 50 हॉस्पीटल बेड, मॅट्ररेस आणि पिलो, 15 मल्टीपॅरा मॉनिटर, 25 हजार आयवी सोडीयम क्लोराईड सलाईन आणि इंजेक्शन, 10 हजार इंजेक्शन पॅन्टोप्रोजोल 40 व 10 मिली, 20 हजार इंजेक्शन सेट्रायझोन, 30 हजार इंजेक्शन मेथॉल, पेडनीसॉलन 40 मिली, 16 हजार इंजेक्शन लो मॉलिक्युलर वेट हॅप्रीन, 4524 टॅबलेट फेव्हिफिरावेअर 200 मिली 34 स्ट्रीप आणि 1 हजार जनरल एक्झमिनेशन ग्लोज 100 पिस पॅकेट हे साहित्य खरेदी करण्यात येणार असून या साहित्य खरेदीस मंजुरी दिल्यामुळे जालना शहरातील कोव्हीड रूग्णांना योग्य ते औषध उपचार व सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल असा विश्‍वास आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *