जालना (प्रतिनिधी) ः कोकण विभागात मागील 15 दिवसापुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पुर आणि या पुरामुळे सदर भागातील शेकडो घरे उध्दवस्त होवून एकच हाहाकार उडाला आहे. पुरग्रस्त भागातील नागरीकांना राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. जालना विधानसभा मतदार संघाचे आ. कैलास गोरंटयाल आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मामा सतकर यांनी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रायगड व चिपळून भागातील पुरग्रस्तांना आ. गोरंट्याल व बाबुराव सतकर यांनी आज 120 क्विंटल गहू राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीकार्गोद्वारे पाठविण्यात आला आहे. या बसला आ. गोरंट्याल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी एस. टी. चालकाचे आ. गोरंट्याल यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, ॲड. राम कऱ्हाळे, सुभाष ढाकणे, डॉ. प्रकाश इंगळे, ॲड. शिवराम सतकर, अरूण घडलिंग, दत्ता घुले आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply