जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा कॉग्रेस सेवा दलाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अब्दुल रफिक यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज शनिवारी त्यांचा आ.कैलाश गोरंट्याल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराट्र कॉग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी एका पत्राव्दारे अब्दुल रफिक अब्दुल रशिद यांची कॉग्रेस सेवा दलाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल अब्दुल रफिक यांचा जालना येथील अंबड चौफूली जवळील शासकीय विश्रामगृहात एका छोटेखानी कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रमास कॉग्रेस सेवा दलाचे जेष्ठनेते तथा प्रदेश सचीव किसन जेठे, माजी नगरसेवक महेमुद पैलवान, कॉगे्रस सेवा दलाच्या प्रदेश सचिव नम्रता थाडा, सेवादल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाताई भागडीया, शहराध्यक्षा संगीता कांबळे, मा. नगरसेवक अनवर मिर्झा, प्रा. नितीन जैस्वाल, जिल्हा शिक्षण समिती समन्वयक काजी नइमोद्दीन, उम्मत बचाओ तहरिकचे अध्यक्ष हमीद शेख, कॉग्रेस सेवा दलाचे जिल्हा समन्वयक बाबासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अमजद खान, युवा नेते असलम कुरेशी, शेख कलाम, सय्यद अफसर यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. या कार्यक्रमात अब्दुल रफिक यांच्या निवडीबद्दल त्यांचे कॉग्रेस कार्यकर्ते शेख वसिमभाई, नगरसेवक शेख शकिल, नजीर शेख, कॉग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन , बबन जाधव, महम्मद खान, सलिम खान, शेख रिजवान यांनी पुष्पहार देवुन स्वागत केले. मोहम्मद दानिश, शेख जोहेब, जेष्ठ नागरिक अब्दुल्ला भाई, वहाब कुरेशी, शेख जुल्फेकार, शेख असलम, शेख अबु बकर, अब्दुल वहिद, अन्सारी काशेफ यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन शेख एकबाल यांनी तर शेवटी आभार बाबासाहेब सोनवणे यांनी मानले.
Leave a Reply