जालना (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी आमदार कैलास गोरंट्याल यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांचे नियुक्ती केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
आ. कैलास गोरंट्याल यांनी नगरसेवक, शहर युवक काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, पदावरुन काँग्रेस पक्षाचे संघटन मार्ग क्रमण करीत जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरुन विकासाभिमुख कार्य करीत विविध शासकीय समित्यावर प्रशसनिय काम केले आहे.
जिल्हातील शेतकर्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी जालना जिल्हा सहकारी बँकेवर उपाध्यक्ष म्हणून यशस्वी पणे काम करीत आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेञात देखील उल्लेखनिय कार्य आहे. पक्षाच्या संघटनात्मक आणि निवडणुकीच्या काळात मराठवाडा आणि अन्य विभागात कॉग्रेस पक्षासाठी मोलाचे योगदान पाहता पक्षश्रेष्ठींनी विशेष करुन श्रीमती सोनिया गांधी , खा. राहुल गांधी यांनी दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे .शुक्रवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांचा जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, आनंद लोखंडे, विनोद यादव, अरुण घडलिंग, गणेश चौधरी, छोटू चिञाल, गोपाल चिञाल, जॉर्ज उगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार श्री गोरंट्याल यांचे अभिनंदन करतांना पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांचे विशेष आभार शहर कॉग्रेस अध्यक्ष शेख महेमूद यांनी मानले.
Leave a Reply