जालना (प्रतिनिधी) ः जालना विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आ. कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजुना अन्नाचे पाकीट वाटप करुन हा सामाजिक उपक्रमला सत्ताहभर राबविण्यात येणार असून त्यांची सुरुवात सोमवार पासुन झाली आहे.
दि. 9 एप्रिल शुक्रवार रोजी आ. कैलाश गोरंट्याल यांच्या वाढदिवस आहे. यानिमिताने शहरातील गरीब गरजुना अन्नाचे पाकीट सोमवार पासुन वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय परिसर आणि चंदनझिरा येथे कॉगेंस पक्षाचे न.प गटनेते गणेश राऊत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी जालना शहरा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमुद, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, डॉ.विशाल धानुरे, मोहन इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, शिवप्रसाद चितळकर, सय्यद जावेद आली आदी पदाधिकारी उपस्थिती होते. आ. श्री. गोंरट्याल यांनी वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्या सदर्भात सुचित केल्यामुळे जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Leave a Reply