ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आ. गोरंट्याल यांच्या हस्ते सोमवारी पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ

October 30, 202114:14 PM 44 0 0

जालना (प्रतिनिधी) : अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष सदस्य नोंदणी करण्या संदर्भात प्रदेश काँग्रेसला आदेशीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हयात दि. 1 नोव्हेंबर सोमवार रोजी पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ जुना जालना गांधी चमन येथे दुपारी 2 वाजता प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे राजाभाऊ देशमुख हे राहतील. प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले हे यादिवशी गडचिरोली जिल्हातून पक्ष नोंदणीच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करणार आहे.

याप्रसंगी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि प्रदेश कॉग्रेसच आजीमाजी पदाधिकार्‍यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे. यावेळी जालना शहर व तालुका कॉग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी आजीमाजी नगरसेवक, जि. प. सदस्य, विविध आघाडीचे अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्याने उपस्थिती रहावे असे आवाहन जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुका अध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत,जिल्हा सरचिटणीस विजय चौधरी, राम सावंत यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *