ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 आ. कैलास गोरंट्याल यांचा मंत्रीमंडळात समावेश करा नम्रता थाडा घेणार 1 लाख स्वाक्षरी अभियान

August 5, 202120:13 PM 23 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना विधानसभा मतदार संघाचे आ. कैलास गोरंट्याल यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस सेवादलच्या सरचिटणीस नम्रता थाडा 1 लाख स्वाक्षरी अभियान राबविणार आहेत. 30 जुलै 2021 रोजी मुंबई येथील काँग्रेस सेवादल प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जालन्याचे विकास पुरुष, जलसम्राट आ. कैलास गोरंट्याल यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्याची मागणी नम्रता ?थाडा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

जालना जिल्हयातील एक प्रतिष्ठीत उद्योजक, शेतकरी तसेच एक उत्तम असे समाजकारणी व राजकारणी म्हणून ओळखले जाणारे आ. कैलास गोरंट्याल  हे काँग्रेस (आय) पक्षाचे एकनिष्ठेने काम करणारे नेते आहेत. तसेच त्यांनी सामाजिक, क्रिडा क्षेत्रात खुप कामे केली आहेत. मतदार संघात विकास कामाकरीता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. आ. गोरंट्याल यांनी गरीबांचे कुठलेही प्रश्न असो त्यांना नेहमी प्रथम प्राधान्य देऊन ते प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लावता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले आहे.  पक्षाच्या हितासह कार्यकर्त्याना सोबत घेवून चालतात सामाजकार्यात देखील त्यांचे भरीव कार्य असल्याचे थाडा यांनी या निवेदनात नमुद केले आहे.  रक्तदान शिबीर, अंधत्वाना मोफत चश्म्याचे वाटप तसेच क्रिडा विषयक कार्यात मॅरेथॉन, मुष्टियुध्द, फुटबॉल, क्रिकेट, कराटे, कुस्ती, बॉक्सींग हे राज्यस्तरीय, जिल्हा व अांतर जिल्हास्तरावर स्पर्धांचे नेहमी आयोजन करीत असतात.  आ. गोरंटचाल हे पक्षाशी एकनिष्ठ असल्याने त्यांनी जालना जिल्ह्यात आपल्या पक्षाच्या कार्यकत्यांची एकजुटीने बांधीलकी करून ठेवलेली आहे. पक्ष वाढीसाठी त्यांची नेहमी धडपड देखील असते. यांनी करोना काळात आपल्या कार्यकत्यांसोबत जालन्यातील नागरीकांची असो किंव्हा बाहेरून आलेल्या नागरीकांची काळजी व त्यांना लागेल ती मदत देखील केलेली आहे. आ.  कैलास गोरंट्याल  यांच्या कार्याची व पक्ष निष्ठेची दखल घेवून राज्याच्या मंत्रीमंंडळात त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी एक लाख स्वाक्षरी अभियान जालना जिल्ह्यात राबविणार असल्याचे नम्रता थाडा या निवेदनात नमुद केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *