ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आ. कैलास गोरंट्याल यांचा मंत्रीमंडळात समावेश करा

July 30, 202118:40 PM 16 0 0

जालना (प्रतिनिधी) ः राज्याच्या संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारामध्ये जालना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी बदनापुर येथील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. जालना जिल्ह्यातील काँगे्रस पक्षाला ताकद देण्यासाठी आ. गोरंट्याल यांचा मंत्रीमंडळात समावेश होणे अंत्यत गरजेचे आहे.

गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदार संघातून आता पर्यंत तीन वेळा निवडुन आलेले असून जालना जिल्ह्यातील अ वर्ग असलेल्या जालना नगर परिषदेवर त्यांनी सातत्याने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिध्द केलेले आहे. जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी आ. गोरंट्याल यांनी महत्वाची भुमीका बजावली आहे. राज्याच्या संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारात आ. गोरंट्याल यांची वर्णी लागल्यास जालना विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी अधिक मदत होईल असा विश्‍वास शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी आ. नानाभाऊ पटोले यांची बोलतांना व्यक्त केला आहे.
निवेदनावर नगरसेवक राजेंद्र जयस्वाल, विधानसभा नेते सुभाष मगरे, जिल्हा उपाध्यक्ष शेख अन्वर अत्तार, नगरसेवक प्रमोद साबळे, शहराध्यक्ष मोबिन खान, नाना पटोले विचारमंचचे जिल्हाध्यक्ष जावेद बागवान,तालुका उपाध्यक्ष शेख युनुस, बदनापूर विधानसभा अध्यक्ष दिपक कायंदे, अल्पसंख्याक ता. अध्यक्ष अस्लम, तालुका उपाध्यक्ष जयसिंग खोकड, युवक शहराध्यक्ष नईम (राजु) शेख, अ. आ. शहराध्यक्ष विकास रगडे, ज्ञानेश्वर ढाकणे, शहर उपाध्यक्ष अलिम शेख, तालुका उपाध्यक्ष मुजीब पटेल, समिर बिल्डर, अलिम खान, तालुका उपाध्यक्ष लतिफ शेख आदी काँग्रेस पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *