ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आ. कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रक्तदान शिबीर, मास्क सॅनिटाइयजर आदी वस्तुचे वाटपः शेख मेहमूद

April 5, 202112:12 PM 6 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार कैलास गोंरट्याल यांच्या वाढदिवसांनिमित्त दि. 9 एप्रिल शुक्रवार रोजी रक्तदान शिबीर व समाज उपयोगी वस्तुचे वाटप आणि मास्क, सॅनिटाइजर अशा समाजाभिमुक कार्यक्रमाचे आयोजन जालना शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी हे कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

दि. 9 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता जुना जालना गांधी चमन येथील जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन व तसेच कोव्हिड 19च्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क आणि सॅनिटाइजर वाटप दि. 5 एप्रिलपासुन सप्ताहभर अन्नदानाचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनांच्या वाढता आजार लक्षात घेता गर्दी असलेल्या कार्यक्रम पुर्णपणे रद्द करण्यात आले आहे. आमदार श्री गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ते स्वतः कोणतेच पुष्पगुच्छ व सत्कार स्विकारनार नाहीत असे सांगण्यात आले आहे. रक्तदान शिबीराचे उद्घाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे असून कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहिल. याप्रसंगी उपस्थिती राहण्याचे आहवान संयोजक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद कॉंग्रेस न.प गटनेते गणेश राऊत, तालुका अध्यक्ष वसंत जाधव, राम सावत, विजय चौधरी, डॉ. विशाल धानुरे, मोहन इंगळे, चंद्रकांत रत्नपारखे, बदर चाउस, आनंद लोखंडे, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, संजय शेजुळ, अरुण घडलिंग, दिनकर घेवदे, गुरुमितसिंग सेना, शेख शमशु, सय्यद करीमबिल्डर, जावेद अली, अफसर चौधरी, फकीरा वाघ, गणेश वाघमारे, निलेश दळे आदींनी केले आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *