जालना (प्रतिनिधी) ः करोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देवून पवित्र रमजान ईद निमित शुभेच्छा दिल्या.
पवित्र रमजान ईद निमित जालना शहरातील जुना जालना व नवीन जालना भागातील ईदगाह परिसरात राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहुन मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देत असतात. परंतु मागील वर्षापासुन महाराष्ट्र राज्यासह देश भरात करोनाने थैमान घातल्यामुळे सर्वं धर्मीय सणांवर संक्रात ओढावली आहे.
जालना जिल्ह्यासह राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने लॉकडाउनचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे जालना शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी राज्य शासनाचे आदेश आणि करोना नियमाचे पालन करत याही वर्षी पवित्र रमजान ईद सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता घरीच नमाज अदा केली. आ. कैलास गोरंट्याल यांनी काल दि 14 मे शुक्रवार रोजी पवित्र रमजान ईद निमित जालना शहरातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून ईद निमित शुभेच्छा दिल्या. यावेळी जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, राम सांवत, जालना जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष बदर चाउस, नदीम पहेलवान, खालेद चाउस, अली चाउस, चंद्रकांत रत्नपारखे, शादाबखान, ॲड. कामरान, अनस चाउस, शेख नदीम, शेख बबलु, गणेश चौधरी, अरुण घडलिंग आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply