जालना (प्रतिनिधी) जालन्याचे आ. कैलास गोंरट्याल यांनी कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी मागील आठवड्यात कॉग्रेस कोव्हीड मदत सहाय्य केंद्र सुरु केल्यानंतर आज शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णांलयाच्या परिसरात निवारा केंद्र सुरु केले आहे. या निवारा केंद्रात कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांना उद्या दि. 24 एप्रिल शनिवार पासुन मोफत अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जालना शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी दिली. जालना शहर व जिल्ह्यात फेबु्रवारी महिन्याच्या प्रारंभापासुन करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने जालना शहरासह जिल्ह्यात तालुका पातळीवर सुरु केले कोव्हीड केअर सेंटर देखील रुग्णांमुळे फुल झाले आहे. शहर व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये देखील आज मितीला हाउसफुल झाली आहेत. रुग्णालयांमध्ये असलेल्या खाटा आणि इतर सुविधा तोकड्या पडु लागले आहे. परिणामी रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची उपचारा बरोबरच जेवण, राहण्याची व्यवस्था आणि इतर सुविधा बाबत मोठे हाल होत असल्याने हि बाब लक्षात घेवून जालन्याचे आ. कैला स गोरंट्याल यांनी मागील आठवड्यात कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी मदत सहाय्य केंद्र सुरु केले होते.
या केंद्राच्या माध्यमातुन कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांच्या असलेल्या अचडणी सोडवण्याचे काम सुरु असतांनाच आज शुक्रवार पासुन जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या परिसरात निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या निवारा केंद्रात कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची आणि जेवणांची व्यवस्था करण्यात आली असुन या उपक्रमांचा सबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेख महेमूद यांनी केले आहे.
सदर निवारा केंद्रात कॉग्रेसचे पदाधिकारी संजय भगत, छोटु चित्राल, गणेश चौधरी, रहिम तांबोळी हे स्वतः उपस्थित राहुन सेवा देणार आहे. कॉग्रेस कोव्हीड मदत सहाय्य केंद्रामार्फेत कोव्हीड रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पदाधिकारी डॉ. विशाल धानुरे, मोहन इंगळे, चंदक्रात रत्नपारखे, फकीरा वाघ आदी पदाधिकारी पुर्ण वेळ सेवा देत असल्याची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमुद यांनी केले आहे.
Leave a Reply