जालना (प्रतिनिधी) ः मागील दीड वर्षा पासून मंठा तालुक्यातील वाघोडा तांडा येथील विज पुरवठा बंद असल्याने गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विज पुरवठा जोडण्यात यावा या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र आ. बबनराव लोणीकर यांनी महावितरणचे अधिकारी खंडागळे यांना सुचना दिल्यानंतर बंद असलेला वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी दिली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, वाघोडा तांडा येथील वीज पुरवठा मागील दीड वर्षा पासून बंद होता. विज पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. आ. बबनराव लोणीकर यांनी महवितरणचे अधिकाऱ्यांना वीज पुरवठा जोडणी करुन देण्याच्या सुचना दिल्या. त्यांनतर महावितरणचे अधिकारी खंडागळे यांनी सदर उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्यास सांगीतल्या नंतर गोर सेनेच्या वतीने उपोषण मागे घेण्यात आले. गोर सेनेच्या वतीने आ. बबनराव लोणीकर यांचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस, जिल्हा उपाध्यक्ष संदीपभाई हिवराळे, जिल्हा चिटणीस सचिन गाडे, तालुका सरचिटणीस अनिल चव्हाण, गोर सेना जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, संदीप राठोड, बाळू राठोड, शाम आडे, शंकर राठोड, रवी पवार आदिंची उपस्थिती होती.
Leave a Reply