ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आ. कैलास गोंरट्याल यांच्या विविध लसीकरण केंद्राना भेटी

May 7, 202115:45 PM 49 0 0

जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र शासनाच्या कोविड-19 लसीकरण मोहीमे अंतर्गत जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी आज दि. 6 मे गुरुवार रोजी जालना मतदार संघातील वखारी,नाव्हा, अंतरवाला या गावातील लसीकरण केंद्राना भेटी दिल्या. यावेळी उपरोक्त तिन्ही गावांमध्ये आ. गोरंट्याल यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

आ. गोरंट्याल यांनी लसीकरण केंद्राच्या व्यवस्थेची पाहणी करुन केंद्रात उपस्थित असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. गावातील व परिसरातील सर्व 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी मतदार संघातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन सर्वांनी लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. गोरंट्याल यांनी केले. यावेळी वखारीचे दत्ता पाटील घुले, काकासाहेब घुले, विनायक घुले, विनायक पवार,अरुण घडलिंग,गणेश चौधरी तसेच नाव्हा येथे नानाभाऊ सुरुसे, अकबर शेख,अनिल सरकटे, अंकुश पाचफुलें, विष्णू भुतेकर,तसेच,अंतरवाला येथील कृष्णा पडुळ, लखन ढगे, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *