ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुक्तीधाम स्मशानभुमीत मयतांवर अंत्यसंस्कारासाठी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातर्फे 15 टन लाकुड भेट

April 28, 202113:56 PM 84 0 0

जालना (प्रतिनिधी) ः करोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींवर येथील मुक्तीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी भासत असलेली लाकडांची टंचाई लक्षात घेवून आ. कैलास गोरंट्याल यांनी आपल्या स्वखर्चातून 15 टन कृत्रीम लाकुड उपलब्ध करुन दिले आहे. जालना शहरातील औरंगाबाद रोड असलेल्या रामतीर्थस्मशानभुमीच्या सुशोभीकरणासह या स्मशानभुमीचा एकुनच सर्वांगिन विकास करण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला होता. आज सदर स्मशानभुमीत गेल्यानंतर एखाद्या गार्डनमध्ये आल्याचा भास होतो.


सध्या जालना शहर व जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज करोना बाधीत रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. जालना नगर पालिकेच्या वतीने शहरातील मंठा रोडवर उभारण्यात आलेल्या मुक्तीधाम या स्मशानभुमीत करोना बाधीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जालना नगर पालिकेच्या वतीने लाकुड, गौवऱ्या व इतर साहित्य उपलब्ध करुन दिले जात आहे. मात्र अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा साठा कमी पडत असल्याने आ. कैलास गोरंट्याल यांनी शहर व विधानसभा मतदार संघातील दानशुर, व्यवसायीक व व्यापाऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी लाकुड उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला अनेकांकडुन उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी लाकड व इतर साहित्य उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली आहे.

परंतु लाकडाशिवाय इतर काही मार्ग असल्यास पर्यावरणाचे नुकसान थांबवता येईल अशा सुचना अनेकांकडुन प्राप्त झाला. ऑक्सिजन देणारी झाडेच नष्ट झाली तर, मग पर्यावरणाचे खूप नुकसान होईल असे मत काहींनी व्यक्त केले. ही सुचना लक्षात घेवून आ. कैलास गारंट्याल यांनी बायोमास ब्रिकेट (कृत्रिम लाकूड) बद्दल माहिती घेत 15 टन कृत्रिम लाकूड मागवले शेतातल्या उर्वरित वेस्टगेजपासून बनविलेल्या, कृत्रिम लाकडांचा वापर अंत्यसंस्कारासाठी केल्यास झाडे तोडणे नक्कीच थांबेल आणि हे काम मानवासाठी कल्याणकारी ठरणार आहे. मुक्तीधाममध्ये आज मंगळवारी आ. कैलाश गोरंट्याल यांच्यासह स्वच्छता सभापती हरीश देवावाले, नगरसेवक आरेफ खान, शेख शकील, अरुण घडलिंग, गणेश चौधरी, जगदीश गौड व इतरांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *