औरंगाबाद : कोरोनाने जगाचे चक्रच विस्कळित केले आहे. सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या माध्यमांवर तर या महामारीचा गंभीर परिणाम झाला आहे.एकटया महाराष्ट्रत माध्यमात काम करणा-या ३० हजार लोकांच्या रोजीरोटीवर कोरोनामुळे थेट परिणाम झाला आहे.पण हे सारे लोक गप्प आहेत,कारण बोलून, ओरडून कोणी ऐकतच नाही,हे वास्तव आहे आणि याला आपणच जबाबदार आहोत.आपण दुसऱ्याच्या एकीसाठी जीव तोडून दैनिकांचे रकाने भरतो मात्र स्वतः वरील अन्यायासाठी कधीही एकत्र येत नाही, बातमी ही देऊ शकत नाहीत.त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून एकत्र यावे लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात शनिवारी (दि.२६) मराठवाड्यातील जिल्हा अध्यक्षांचा व विभागीय पदाधिका पदाधिकाऱ्यांचा झाला. यावेळी बोलताना वसंत मुंडे म्हणाले की, औरंगाबादेत घेण्यात आलेल्या संपादकांच्या पहिल्या गोलमेज परिषदेचे सकारात्मक बदल संपूर्ण महाराष्ट्रात दिसू लागले आहेत.जवळपास १८ दैनिकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अंकाच्या विक्री किंमत वाढ केली.मी या सर्व दैनिकांच्या संपादकांशी बोललो. किंमत वाढविण्याच्या काय परिणाम झाला अशी विचारणा केली असता सर्वांनी सांगितले की वाचकांनी किंमत वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. यांचा अर्थ एवढे दिवस आपणच आपले अवमुल्यन करून घेतले होते,हे आता अनेक संपादक, मालकांच्या लक्षात आले.हे जेव्हा महाराष्ट्रातील सर्वच संपादक, मालकांच्या लक्षात येईल तेव्हा वर्तमानपत्रांत सोनेरी युग अवतरेल,असा आशावाद शेवटी वसंत मुंडे यांनी व्यक्त केला.
२०२१ या नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यप्रणालीवर या मेळाव्यात सखोल चर्चा व नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात पत्रकार संघाचे जाळे नव्याने निर्माण करण्यासाठी वसंत मुंडे यांनी सर्व जिल्हा अध्यक्षांना जिल्हा पिंजून काढून अनुभवी व दर्जेदार लिखाण करणा-या पत्रकारांची फळी तयार करण्याचे आवाहन केले.या मेळाव्याला मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ.प्रभू गोरे, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील , परभणी जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण, हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply