जालना (दि. २) दरवर्षी प्रमाणे 2 ऑक्टोबर हा दिवस भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अधिनिस्त असलेल्या शासकीय जलभंजन पथके तसेच विंधनयंत्राचा क्षेत्रिय काम शुभारंभ करण्याचा दिवस आहे. त्यानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जालना यांचे अधिनिस्त असलेले जलभंजनपथक क्रमांक 7 या पथकाचा क्षेत्रिय कामाचा शुभारंभ आज मौजे वाघरूळ (जहांगीर) ता. जालना येथील शासकीय विंधन विहिरीचे वरिष्ठ अभियंता *श्री मनोज सुरडकर* यांचे। हस्ते श्रीफळ फोडून जलभंजन काम करून करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, सहाय्य्क भूवैज्ञानिक चक्रधर चव्हाण, उपअभियंता विकास सगदेव, कनिष्ठ भूवैज्ञानिक कृष्णा देशपांडे, दौलत ढवळे, महादेव आष्टीकर, राम विभुते, सुनील जगताप, विशाल म्हस्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे भूजल पातळी खोल जात असल्याने विंधन विहिरी( बोअर) बंद पडत आहे बंद पडणाऱ्या बोअर च्या दिशेने परिसरातील पाण्याचे झरे वळून या बोअर जिवंत करण्यासाठी जलभंजन केले जाते. जलभंजन यंत्राद्वारे पाण्याच्या दाबाने बोरचे पुनरुज्जीवन करून पाण्याची उत्पादकता वाढवली जाते. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जालना यांचे अधिनिस्त एक जलभंजन पथक असून या यंत्राद्वारे आतापर्यंत जवळपास १८७६ विंधन विहिरीचे जलभंजन (हायड्रो फॅक्चरिंग) करण्यात आले असून १४२३ विंधन विहिरीचे यशस्वीरीत्या पुनरुज्जीवन झाले आहे. विंधन विहिरीचे यशस्वीरीत्या पुनरुज्जीवन झाल्याने नवीन विंधन विहीर घेण्याचा खर्च वाचून शासनाची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याच्या विंधन विहिरीचे या यंत्राच्या साहाय्याने जलभंजन (हायड्रो फॅक्चरिंग) करणेसाठी जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी सहाय्य्क भूवैज्ञानिक चक्रधर चव्हाण यांनी केले आहे
Leave a Reply