नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करण्यात आला. केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरास प्रारंभ झाला असून यावेळी भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते सुदत्त, भंते शिलभद्र, भंते संघमित्र, भंते सारीपुत्र, भंते शाक्यपुत्र, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, धम्मसेवक गंगाधर ढवळे, नागोराव नरवाडे, साहेबराव नरवाडे, उमाजी नरवाडे, आप्पाराव नरवाडे, निवृत्ती लोणे यांची उपस्थिती होती.
ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे सुरू झालेल्या शिबिरात पोपटराव ससाणे(पुणे), राज सुर्यवंशी ( हडको, नांदेड), सुमेध पाईकराव ( पालीनगर नांदेड), संघर्ष थोरात ( भेंडगाव, वसमत), सुशिल थोरात ( भेंडेगाव वसमत), पंकज लोणे (लहान, अर्धापूर) आदींना दीक्षा देण्यात आली. त्यानंतर भिक्षापात्र व चिवर प्रदान करुन त्यांचा नामकरण सोहळा संपन्न झाला. त्यात अनुक्रमे भंते शाक्यवर्धन, भंते शाक्यसिंह, भंते सुगत, भंते सूर्यसेन, भंते सुनित, भंते संघघोष असे नामकरण करण्यात येऊन श्रामणेर जीवनास प्रारंभ करण्यात आला. शिबिरात पाली भाषा शिक्षण, त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, सूत्त पठण, विनय पठण, धम्मचर्चा, ध्यान साधना आदी कार्यक्रम नियमित होत आहेत.
Leave a Reply