उरण दि 25(रागिणी ममताबादे )उरण तालुक्यात भारतीय जनता पार्टी तर्फे विविध विकासकामे सुरु असून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी उरण केगाव मुख्य रस्त्याचे दुसऱ्या टप्प्याचे मजबुती करण्याकरिता 49,99,542 रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेतले होते. त्या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रीना घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी नाका ते आवेडा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.या रस्त्याचे आज उदघाटन झाले.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना, ग्रामस्थांना, प्रवाशी वर्गांना प्रवास करणे सोप्पे, सुलभ, आरामदायी होणार आहे.असे रीना घरत यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक कौशिक शहा,नगरसेवक राजू ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य रीना घरत,उद्योजक देवेंद्र पाटील, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर,केगाव भाजपा अध्यक्ष अंकित म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील,उपाध्यक्ष गणेश पाटील,विभागप्रमुख विलास काठे, प्रभारी विभागप्रमुख अरविंद पवार, सचिव विनेश पाटील,बूथ अध्यक्ष अक्षय पाटील, युवा अध्यक्ष मिथुन पुरव,युवा सचिव विराज म्हात्रे आदी भाजपाचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ अतिष हुजरे, हिराजी कांबळे, गजानन म्हात्रे, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.सदर रस्त्याचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थ,नागरिकांनी आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य रीना घरत व केगावच्या भाजपच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले आहे.
Leave a Reply