ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

१०० शिक्षक क्लबचा स्तुत्य उपक्रम  जागर स्त्री शक्तीचा

October 10, 202113:46 PM 45 0 2

जालना(अनिता पवार)  : जालना जिल्ह्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने १०० शिक्षक क्लबची स्थापना झालेली आहे. १०० क्लबच्या सदस्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून शैक्षणिक,सामाजिक परिवर्तन कार्यात स्वतः ला झोकुन दिले आहे.


नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने १०० शिक्षक क्लबच्या माध्यमातून “जागर स्त्री शक्तीचा” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महिला शिक्षिकांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निराकरण करणे,सैनिटरी नॅपकिनच्या वापराबाबत जागरूकता,सैनिटरी नॅपकिन डीसपोझल मशीनबाबत आग्रह, good touch bad touch बद्दल मुलींमध्ये जागृती, कराटे प्रशिक्षण आयोजित करणे,संस्कार वर्ग चालविणे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे इत्यादी. महाराष्ट्रातील स्त्रियांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी चालविलेल्या “अष्टभुजा हिरकणी” या महिलांच्या साप्ताहिकातून वास्तवदर्शी लेख , साहित्य अशा विविध माध्यमातून प्रभावी लिखाण करणे, वाढदिवसानिमित्त रक्तदान करणे यासारखे उपक्रम राबविले.जिल्हा परिषद सी.ई.ओ श्री. मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मिशन कवच कुंडल अभियानास बळकटी देऊन 100 टक्के लसीकरणासाठी जनजागृती करण्याचे काम १०० शिक्षक क्लबच्या महिला सदस्या करीत आहेत.
शैक्षणिक जबाबदारी सोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आधुनिक नवदुर्गांनी खऱ्या अर्थाने सावित्रीमाईच्या ज्ञानदानाच्या वशासोबतच राजमाता जिजाऊसाहेब यांची ध्येयवादी दूरदृष्टी, हिरकणीचे ममत्व, ताराराणीचे नेतृत्वगुण, अहिल्याबाईंचा व्यावहारिक नियोजनबध्दता,रमाईचा ठाम पणे पाठीशी उभे राहण्याचा गुण अंगीकारले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याप्रसंगी मनीषा पाटील, डॉ.शिवनंदा मेहेत्रे,माया कवानकर,अनिता पवार, प्रभा जाधव,कविता दाभाडे,स्वाती गव्हाणे, सविता तायडे,विजया मगर उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *