ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक -मालक संघटनेचा स्तुत्य उपक्रम

November 7, 202114:02 PM 59 0 0

उरण (संगिता पवार) : उरण शहरातील लाला मैदन( वीर सावरकर मैदान ) जवळ असलेली उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक -मालक संघटनेचे नेहमीच स्तुत्य करीत असतात . दीपावली सणाचे निमित्ताने दर वर्षी प्रमाणे उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक -मालक संघटनेच्या मेंबरांना बुधवार ( दि. ३) रोजी मिठाई व १क हजार रुपये रक्कम वाटप आली .

२०२०२ साली कोरोनाच्या काळात लॉक डाऊन असल्याने काम कमी झाले होते . रिक्षा चालकास संघटनेच्या कडून आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपयाची मदत देण्यांत आली .तसेच सदर संघटनेचे कोणतेही सभासद मृत्यु झाला त्या कुटुंबाला रोख १० हजार रुपये मदत दिली जाते वर्षात गुढी पाडव्याला सत्य नारायण पूजेचे आयोजन केले जाते .त्याच प्रमाणे करंजा ते शिर्डी पायी पद यात्रा जाणाऱ्या भक्तांना संघटनेच्या वतीने चहा नास्था ची व्यवस्था केली जाते .नोटीस बोर्डावर सुविचार ,मोठ्यांचे विचार लिहून जनजागृती केली जाते . या कामी उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक -मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील ,सेक्रेटरी महेंद्र नामदेव घरत ,खजिनदार दिपक म्हात्रे ,सल्लागार जयराज म्हात्रे , रमेश म्हात्रे ,माजी सेक्रेटरी कैलास म्हात्रे ,अजय धोत्रे ,आदी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *